राज्यातील कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ!

  |   Akolanews

अकोला: ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या नवीन वेतनश्रेणीनुसार राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागात बीएएमएस कंत्राटी डॉक्टरांची पदभरती करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गत अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत राज्यातील सर्वच कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे.

ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागात वैद्यकीय सेवा पुरवणाºया बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता दुपटीने वाढ करण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राज्य सरकारने कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (वर्ग-अ) मानधनात वाढ केली आहे; मात्र त्यामध्ये बीएएमएस डॉक्टरांच्या उल्लेख नव्हता. यानंतर बीएएमएस डॉक्टरांकडून रोष व्यक्त करण्यात आला होता. शिवाय, दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देण्यास अनेकांचा नकारही वाढत होता. ही बाब लक्षात घेता राज्य सरकारने कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागात बीएएमएस डॉक्टरांची कंत्राटी तत्त्वावर पद भरती करण्यात येणार असून, त्यांना वाढीव मानधन दिले जाणार आहे....

फोटो - http://v.duta.us/L9uUTAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/mnd-WgAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬