सर्वोत्तम कामगिरीत पारस औष्णिक विद्युत केंद्राचा देशात पाचवा क्रमांक

  |   Akolanews

पारस (अकोला) ८ जूलै : केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ३० जून २०१९ पर्यंत देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १५ औष्णिक विद्युत केंद्रांची नुकतीच यादी जाहीर केली असून, त्यामध्ये महानिर्मितीच्या ५०० मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राचा पाचवा क्रमांक आहे. यापूर्वी सलग तीन महिन्यांपासून पारस वीज केंद्राची कामगिरी देशात सरस ठरली आहे. ज्यात एप्रिलमध्ये सहावा, मे मध्ये चवथा आणि जून मध्ये-पाचवा क्रमांक पटकाविला आहे.

सर्वोत्तम कामगिरीत देशातील सार्वजनिक, शासकीय आणि खाजगी औष्णिक विद्युत केंद्रांचा समावेश आहे. ज्यामध्ये अमरकंटक वीज केंद्र, मध्यप्रदेश (प्रथम-९८.८७ भारांक), एन.टी.पी.सी., तालचर ओरिसा (द्वितीय-९८.१८ भारांक), रिलायन्स ससान सिंगारोली मध्यप्रदेश (तृतीय-९६.५७ भारांक), बज बज आर.पी.संजीव गोयंका पश्चिम बंगाल(चवथे-९६.२२ भारांक) तर महानिर्मिती पारस वीज केंद्र (पाचवे- ९५.३१ भारांक)....

फोटो - http://v.duta.us/L9rXcAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/dPrxwAAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬