[mumbai] - पुढील २४ तासही मुंबईत जोरदार बरसणार पाऊस

  |   Mumbainews

मुंबई:

रविवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारपासून पुन्हा बरसायला सुरुवात केली. मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच वरुणराजाने दमदार हजेरी लावली. हा पाऊस पुढील २४ तास मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ठाण मांडणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईला आपल्या आगमनाने मुंबईला अक्षरश: धुवून काढलं. जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला कोकणसह मुंबईत धुव्वाधार पाऊस झाला. त्यानंतर काहीशा विश्रांतीनंतर सोमवारपासून पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली. काही तासांच्या संततधार पावसाने रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक सखल भागात पाणी साचले.

९ जुलै रोजीही ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या २४ तासांत बरसणारा हा पाऊस जोरदार असला तरी तो संततधार नसेल, अधूनमधून विश्रांती घेत तो बरसणार असल्याची वेधशाळेची माहिती आहे....

फोटो - http://v.duta.us/zRs5zQEA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/GzN4-AAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬