[mumbai] - बाधित कुटुंबाना राज्य व केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार- शरद पवार

  |   Mumbainews

रत्नागिरी:

चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्यानंतर पाच दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. तसंच बाधित कुटुंबाला केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. यावेळी गावापासून दूरवर आमचे पूनर्वसन करा अशी मागणी तिवरे ग्रामस्थांनी केली आहे.

आमदार भास्करराव जाधव यांनी बाधित कुटुंबाना राज्यशासन व केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी शरद पवारांकडे केली होती. त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज तिवरे येथील बाधित कुटुंबांना दिली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून मृतांच्या कुटुंबीयांना यावेळी प्रत्येकी १ लाखाचा धनादेश देण्यात आला आहे. पवार यांनी यावेळी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केलं. तिवरे ग्रामस्थांशी चर्चा करून शरद पवार यांनी त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या....

फोटो - http://v.duta.us/O65P2AAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/cJ4q4AAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬