[nagpur] - नागपूर: नोकऱ्या द्या, अन्यथा बॉम्बस्फोट; पत्रके सापडली

  |   Nagpurnews

नागपूर:

खुल्या प्रवर्गातील तरुणांना नोकरी द्या...विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक कर्ज द्या, सरकारी कर्मचाऱ्यांनो, आळस सोडून काम करा; अन्यथा बॉम्बस्फोट घडवून आणू, अशा आशयाची पत्रके सापडल्यानं नागपुरात खळबळ उडाली आहे. अमरावती मार्गावरील कॅम्पस समोरील बसथांब्यावर सोमवारी सकाळी ही धमकीची पत्रके सापडली.

कॅम्पससमोरील बसस्थांब्यावर तीन पत्रके चिकटवल्याचं सोमवारी सकाळी आठच्या सुमारास प्रवाशांच्या निर्दशनास आले. त्यात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक कर्ज देण्यात यावे, शासकीय कर्मचाऱ्यांनी आळस सोडून काम करावे, आरक्षण सर्वांना संपवेल. हा इशारा गांभीर्याने न घेतल्यास बॉम्बस्फोट घडवून आणण्यात येईल. आमच्याकडे शार्प शूटर व हल्लेखोरांची ‘फौज’ आहे. ‘यमराज की उंगली रिमोट पर हैं’,असा धमकीवजा इशारा या पत्रकाद्वारे देण्यात आला आहे. या पत्रकांबाबत माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पत्रके ताब्यात घेतली आहेत. बस थांब्यावर पत्रके लावणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे....

फोटो - http://v.duta.us/C024WwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/-vzcUAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬