[navi-mumbai] - सायन-पनवेल महामार्गावर गुडघाभर पाणी, ४० वाहने अडकली

  |   Navi-Mumbainews

पनवेल: आज सकाळपासूनच मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील कोपरा गावाजवळील सायन-पनवेल महामार्गावर प्रचंड पाणी भरले आहे. जवळ जवळ गुडघाभर पाणी भरल्यामुळे या महामार्गावर सुमारे ३० ते ४० वाहने अडकली आहेत.

मुंबईसह ठाण्यात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नवी मुंबईतही पावसाने धिंगाणा घातल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. गेल्याच आठवड्यात खारघरमध्ये ओढा फुटला होता. आजच्या पावसामुळेही हा ओढा फुटल्याने पांडवकड्याहून वाहत येणारे पाणी सायन पनवेल महामार्गावर आले आणि पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. कोपरागावाजवळी सायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी झाले. पाण्याचे लोंढेच्या लोंढे महामार्गावर आल्याने बघता बघता संपूर्ण महामार्ग पाण्याखाली जाऊन या परिसरात गुडघाभर पाणी साचले. पूरसदृश्य परिस्थिती झालेल्या या पाण्यात ३० ते ४० गाड्या अडकून पडल्या. त्यामुळे या महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसली तरी आठवडाभरात सलग दुसऱ्यांदा हा ओढा फुटल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे....

फोटो - http://v.duta.us/4LAwDwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/2gk6fgAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬