[pune] - मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

  |   Punenews

:

पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पावसामुळे खंडाळा (बोरघाट) घाटात मंकीहिल जवळ मिडल आणि डाऊन लोहमार्गावर दरड कोसळली तर खंडाळ्यातील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर रेल्वे साठे मिसळ मागे लोहमार्गावर मार्गालगतची संरक्षक भिंत कोसळली होती. या घटनांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून, रेल्वेच्या वतीने मार्गावरील दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे पुण्याकडे येणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मंकीहिल ते कर्जत दरम्यान लोहमार्गावर दरड कोसळण्याची ही १५ दिवसातील चौथी घटना आहे.

ठाकूरवाडी ते मंकी हिल किलोमीटर ११६ व १२५ जवळ दरड कोसळली असून व ओव्हरहेड वायर तुटली आहे ते मुळे पुणे कडे जाणारी वाहतूक थांबवून ठेवली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या अपघातात रेल्वेचा एक कर्मचारी जखमी झाला आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी घडलेली नाही. यापूर्वी २५ जूनला याच ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली होती. तर त्यापूर्वी १३ जूनच्या रात्रीही ठाकूरवाडी ते मंकीहिल दरम्यान दरड कोसळली होती.

फोटो - http://v.duta.us/Val01wAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Edrh5gAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬