अकोटच्या दिव्यांग धीरजने रशियामधील माउंट एलब्रुसवर फडकविला तिरंगा

  |   Akolanews

ठळक मुद्देशिखराची उंची ५ हजार ६४२ मीटर एवढी असून अत्यंत प्रतिकुल वातावरणात चढाई करावी लागते. कडाक्याची थंडी व खडतर वातावरणाशी दोन हात करीत धीरजने धाडसी वृत्तीचा परिचय दिला आहे. १५ आॅगस्ट रोजी रात्री चढाईला सुरुवात करुन १६ आॅगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता शिखर गाठले.

अकोट: येथील दिव्यांग गिर्यारोहक धीरज बंडू कळसाईत या २२ वर्षीय युवकाने रशियामधील सर्वोच्च हिम शिखर माउंट एलब्रुस सर करीत स्वातंत्र्यदिन तिरंग्याला अनोखी मानवंदना दिली. त्याच्या या विक्रमामुळे अकोला जिल्हाच्या नव्हे तर महाराष्ट्रच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. एक हात, एक पाय नसतानासुद्धा जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व धाडसाच्या बळावर हे शिखर गाठले. भारतातून हे शिखर सर करणारा धीरज कळसाईत हा पहिला दिव्यांग असल्याचे मानल्या जात आहे....

फोटो - http://v.duta.us/VqoQWQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/oPdP0QAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬