केरळ पश्‍चिम घाटात नवीन पालीचा शोध

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

वन्यजीव संशोधक डॉ. अमित सय्यद यांनी केरळ राज्यातील शेतमाला भागातील पश्‍चिम घाटात दुर्मीळ व नवीन पालीचा शोध लावला आहे.

अमित सय्यद हे 2015 पासून पालीवर अभ्यास करत आहेत. 1870 साली बेडॉम नामक ब्रिटीश संशोधकांनी अशाच एका पालीचा शोध लावला होता. ती पाल नवीन प्रजाती सारखीच दिसत असल्यामुळे सापडलेली ती हीच पाल आहे, असे गृहीत धरले जात आहे. केरळमधील पाल ही नवीन प्रजातीची आहे. या पालीसाठी अमित सय्यद यांनी 4 वर्षे अभ्यास केला. यादरम्यान केरळ व तामिळनाडूच्या जंगल भागामध्ये जावून त्या पालीचे अस्तित्व, संख्या, प्रजनन व त्यांच्या अन्नसाखळीचा सखोल अभ्यास केला. या पालीला निमॉस्पिस अ‍ॅरण बोरी असे नाव दिले आहे. हे नाव अ‍ॅरणबोर नामक वन्यजीव संशोधक यांच्या नावाने देण्यात आले आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Discovery-of-new-shifts-in-Kerala-Western-Ghats/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/Discovery-of-new-shifts-in-Kerala-Western-Ghats/

📲 Get Satara News on Whatsapp 💬