खटाव येथे अपघातात एकजण ठार; दोघे गंभीर

  |   Sataranews

खटाव : प्रतिनिधी

खटाव येथील जाधवाचे लवान परिसरात शुक्रवारी दुपारी दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार, तर दोनजण गंभीर जखमी झाले.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र शिंदे (वय 28, रा. जाखणगाव) हा युवक मोटार सायकलवरून (क्र. एमएच 11 सीसी 6731) वडूजला निघाला होता. त्याचवेळी करण शशिकांत चव्हाण हा त्याच्या दुचाकीवरून (क्र. एमएच 12 क्यूके 2896) वडूजकडून खटावला येत असताना दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात रविंद्र शिंदे याच्या उजव्या पायाला, छातीला व पोटाला गंभीर दुखापत झाली तर यामाहचा चालक करण चव्हाण आणि अनिकेत राजेंद्र फडतरे दोघेही गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी वडूज येथील खाजगी रुग्णालयात दाखली करण्यात आले. मात्र, शिंदे याला पोटाला गंभीर इजा झाल्याने पुढील उपचारासाठी सातारला नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. अपघाताची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात झाली असून सपोनि विश्वजीत घोडके पुढील तपास करत आहेत.

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/One-killed-in-accident-at-Khatav/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/One-killed-in-accident-at-Khatav/

📲 Get Satara News on Whatsapp 💬