गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा, मुख्याध्यापकाचे विद्यार्थीनींसोबत अश्लील चाळे

  |   Maharashtranews

औरंगाबाद : विद्यार्थीनींशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकास स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमात चांगलाच चोप देण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून मुख्याध्यापकला अटक करण्यात आलीय. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी इथली घटना आहे. चिंचोली लिंबाजी इथल्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नागोराव कोंडिबा काकळे हा मागील काही दिवसापासून शाळेतील अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करीत होता.

महत्त्वाचं म्हणजे, या प्रकाराविषयी मुलींनी काही पालकांना कल्पना दिली होती. मात्र मुलींचा गैरसमज झाला असावा आणि मुलींचा प्रश्न म्हणून या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं.

तसंच मागील पंधरा दिवसापासून चौथीच्या वर्गातील एक मुलगी शाळेत जाण्यास टाळाटाळ करत होती. ही मुलगी कायम भीतीच्या वातावरणात राहत असल्याचे लक्षात आल्याने तिला तिच्या पालकांनी तिला विश्वासात घेऊन बोलते केले तेव्हा शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा हा भयंकर प्रकार उघडकीस आला....

फोटो - http://v.duta.us/xXmq7wAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/kGdRQAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬