‘जीएमसी’त मृतदेह आढळल्यास कुणी जबाबदारी घेईना!

  |   Akolanews

अकोला: सर्वोपचार रुग्णालयात अनेकदा अनोळखी मृतदेह आढळतात; पण त्या मृतदेहाची माहिती पोलिसांना देणे आणि शवविच्छेदनासाठी पाठविण्याची जबाबदारी कोणीच घेत नसल्याचे वास्तव आहे. या मुद्यावरून नेहमीच वैद्यकीय अधिकारी अन् शासकीय सोशल वर्कर्समध्ये वाद होत असल्याने येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या मदतीसाठी सोशल वर्कर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत सर्वोपचार रुग्णालयात सहा सोशल वर्कर्स कार्यरत आहेत. सोशल वर्कर्सच्या माध्यमातून रुग्णांना आवश्यक माहिती पुरविण्यासह त्यांना विविध सामाजिक उपक्रमातून आर्थिक मदत पुरवणे अपेक्षित आहे; मात्र त्यांच्यावर इतर प्रशासकीय कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अशातच सर्वोपचार रुग्णालय परिसरात अनोळखी मृतदेह आढळल्यास ब्रॉड बाय म्हणून शासकीय सोशल वर्कर्सची जबाबदारी असल्याचे सांगण्यात येते; परंतु शासकीय सोशल वर्कर्सच्या मते घटनास्थळी उपस्थिती नसताना त्यांना ब्रॉड बाय म्हणून पुढे करणे अयोग्य आहे. अशा परिस्थितीत ही जबाबदारी कोणी स्वीकारावी या बाबत गोंधळाची स्थिती आहे. याचा प्रत्यय तीन दिवसांपूर्वी सर्वोपचार रुग्णालयात अनुभवायला मिळाला. येथील सध्याची परिस्थिती पाहता सर्वत्र गोंधळाची स्थिती असून, सोशल वर्कर्सची नेमकी जबाबदारी काय, येथे आढळणाऱ्या अनोळखी मृतदेह आढळल्यास ब्रॉड बाय म्हणून कोणाचे नाव टाकावे, याचे चिंतन करण्याची गरज आहे....

फोटो - http://v.duta.us/5n5CyAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/NcL5lQAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬