पाण्याच्या बाटलीवर दिवस काढण्याचा प्रसंग

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

फोंडा केरयेत संरक्षण भिंत कोसळून जलवाहिन्या फुटल्याने राजधानी पणजीत सलग तिसर्‍या दिवशी नळ कोरडे राहिले. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी अक्षरश: वणवण फिरावे लागत आहे. पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन दिवस ढकलण्याची वेळ पणजीवासीयांवर आली आहे.

दरम्यान, जलवाहिन्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनीदेखील सोमवारपासून पाण्याचा पुरवठा होईल, असे आश्‍वासन दिले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, या जलवाहिन्यांचे काम पूर्ण करुन पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांना मोफत टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जाईल. या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामावर आपण वैयक्‍तिकपणे लक्ष देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

फोंडा केरयेत 15 ऑगस्ट रोजी संरक्षण भिंत कोसळून जलवाहिन्या फुटल्याने तिसवाडीसह फोंडा तालुक्यातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भर पावसात विशेषत: तिसवाडीच्या रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/Water-supply-off-in-Ponda/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Goa/Water-supply-off-in-Ponda/

📲 Get goanews on Whatsapp 💬