पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले कराडकर

  |   Sataranews

कराड : प्रतिनिधी

कराड, पाटण तालुक्यासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील विक्रमी अतिवृष्टीमुळे कोयना नदीला आलेल्या महापुराचा तडाखा बसलेल्या तांबवे येथील पूरग्रस्त मुस्लिम समाज बांधवांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देत दैनिक ‘पुढारी’ने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या पुढारी रिलीफ फाऊंडेशनसाठी साडेसात हजारांचा निधी दिली आहे. दरम्यान, कराड शहर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनीही दहा हजारांची मदत सुपूर्त केली आहे.

तांबवेतील पूरग्रस्त समाज बांधवांनी प्रार्थनास्थळी एकत्र येत पूरग्रस्तांना मदत देण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे तांबवे गावाला कोयना नदीच्या महापुराचा पूर्णपणे वेढा होता. गावातील सुमारे 2 हजार लोकांना विस्थापित करण्यात आले होते. यात मुस्लिम समाज बांधवांचाही समावेश होता. महापुरामुळे तांबवे गावात लाखोंचे नुकसान झाले आहे. मात्र असे असूनही सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आपल्याहून जास्त नुकसान झाल्याची भावना व्यक्त करत तांबवेतील पूरग्रस्त मुस्लिम समाज बांधवांनी दैनिक ‘पुढारी’च्या यापूर्वीच्या कार्याची दखल घेत साडेसात हजाराचा निधी पुढारी रिलीफ फाऊंडेशनकडे जमा केली आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Karad-to-help-flood-victims/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/Karad-to-help-flood-victims/

📲 Get Satara News on Whatsapp 💬