पूरग्रस्ताचा फ्लॅट फोडला

  |   Sanglinews

सांगली : प्रतिनिधी

येथील पूरग्रस्त संजय मारुतीराव शिंदे यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी अडीच लाखांची रोकड व चांदीची भांडी असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. दि. 6 ते 8 ऑगस्ट या कालावधीत ही घटना घडली.

माधवनगर रस्त्यावर बायपास रस्त्यालगत वेंकटेशनगरमध्ये समर्थ बिल्डिंग आहे. तिथे फ्लॅट क्रमांक 39 मध्ये शिंदे राहतात. गेल्या आठवड्यात महापुराचे पाणी या परिसरात शिरले होते. तत्पूर्वी, शिंदे यांनी घरातील किमती साहित्य विशेषत: रोकड व चांदीचे दागिने घरातील एका पत्र्याच्या पेटीत ठेवले होते. ही पेटी त्यांनी फ्लॅटच्या दुसर्‍या मजल्यावर ठेवली होती. त्यानंतर ते कुटुंबीयांसह अन्यत्र स्थलांतरित झाले होते.

मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दुसर्‍या मजल्यावरील जिन्याचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. पत्र्याच्या पेटीमधील अडीच लाखांची रोकड व चांदीची भांडी तसेच चांदीचे देवपूजेचे ताम्हण, तांब्या, पळी, पंचपात्र, निरंजन, घंटी, अगरबत्ती, ताट व गणपती हार असा ऐवज लंपास केला....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Theft-in-Flooding-flat/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Theft-in-Flooding-flat/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬