पूरग्रस्त महिला व मुलांसाठी उबदार कपड्यांची गरज : आ. शंभूराज देसाई

  |   Sataranews

कराड : प्रतिनिधी

पाटण तालुक्यात पूर परिस्थितीमुळे अनेक गावे ,वाड्या वस्त्या यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. बाधित कुटुंबांसाठी धान्य ,कपडे जमा होत आहेत, पण महिला व लहान मुलांसाठी स्वेटरची गरज आहे. धान्य, अर्थिक साहाय्य यासोबत उबदार कपड्यांचीही मदत करा असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत केले .

बाळासाहेब देसाई कारखान्यावर पूरग्रस्तांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. लोकांनी दिलेली मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल त्याची खबरदारी घेण्यात आली आहे. पूरग्रस्तांसाठी धान्य व कपडे जामा होत आहेत. मी जेव्हा बाधित झालेल्या घरांची व कुटुंबांची भेट घेऊन पाहणी केली तेव्हा या कुटुंबातील महिला व लहान मुलांना उबदार कपड्यांची गरज असल्याचे दिसून आले. त्यामुळे दानशूर व्यक्ती व नागरिकांनी स्वेटर व उदार कपडे देसाई कारखान्यावरील मदत केंद्रात जमा करावेत असे आवाहन आमदार देसाई यांनी केले आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Need-for-warm-clothes-for-flood-affected-women-and-children-sayes-mla-shambhuraj-desai/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/Need-for-warm-clothes-for-flood-affected-women-and-children-sayes-mla-shambhuraj-desai/

📲 Get Satara News on Whatsapp 💬