पूरबाधित घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करा : जिल्हाधिकारी

  |   Sanglinews

सांगली : प्रतिनिधी

पुरामुळे बाधित झालेली घरे राहण्यासाठी सुरक्षित आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करण्यासाठी त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी अभियंत्यांची टीम तयार करण्यात आली आहे. या टीमने त्यांना नेमून दिलेल्या भागातील पूरबाधित घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने पूर्ण करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिल्या.

पूरबाधित घरांचे स्ट्रकचरल ऑडिट करण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या अभियंत्यांच्या टीमला मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. चौधरी बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, उप विभागीय अधिकारी विकास खरात, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, तहसीलदार शरद पाटील उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, पूर ओसरला असल्याने नागरिक, ग्रामस्थ त्यांच्या घराकडे परतू लागले आहेत. मात्र, पुराने बाधित घरे कमकुवत झाली असण्याची शक्यता आहे. त्यांचे पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे. त्यासाठी नेमण्यात आलेल्या टीमने वस्तुनिष्ठ ऑडिट करून त्याबाबतचे दैनंदिन अहवाल सादर करावेत....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Perform-a-structural-audit-of-flooded-homes-says-Collector/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Perform-a-structural-audit-of-flooded-homes-says-Collector/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬