भाजप कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठी आलेले पैसे लाटतायत; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

  |   Maharashtranews

कोल्हापूर: भाजपाचे कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठीची आर्थिक मदत बोगस नावे टाकून लाटत असल्याचा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. मात्र आपण गप्प बसणार नाही. गरज पडल्यास हाती दांडके घेऊ, असा इशारा शेट्टींनी दिला. यावेळी त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली.

बोगस पूरग्रस्तच मदत लाटत असल्याचा गौप्यस्फोट 'झी २४ तास'ने केला होता. यावरून कोल्हापुरातील शिरोळच्या नवे दानवाड गावात तुंबळ हाणामारी झाली. खऱ्या पूरग्रस्तांना डावलल्याने संताप अनावर झाला आणि या संतापाचे रुपांतर हाणामारीत झाले होते.

पूरग्रस्तांसाठी सरकार आणि संपूर्ण राज्यभरातून आर्थिक मदतीचा ओघ येत आहे. मात्र, गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवकांना हाताशी धरून पूरग्रस्तांची आर्थिक मदत दुसऱ्यांच्याच खिशात घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत....

फोटो - http://v.duta.us/u4PWrQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ijFq6QAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬