मिरजेत स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण

  |   Sanglinews

मिरज : शहर प्रतिनिधी

शहरातील दोन वेगवेगळ्या भागांत स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. शहरातील कुपवाड रस्त्यावर असलेल्या एका कॉलनीमध्ये राहणार्‍या एका महिलेला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले.

शहरातील रेल्वेस्थानक परिसराजवळ राहणार्‍या एका पुरुषाला त्रास होऊ लागला. त्याला सांगलीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला स्वाईन फ्लू झाल्याचा अहवाल शनिवारी आला आहे. त्यामुळे महापालिकेल्या आरोग्य विभागाने त्या खासगी रुग्णालयात जाऊन पाहणी केली. त्यानंतर तो रुग्ण राहत असलेल्या परिसरातही सर्व्हे केला. त्या परिसरात आरोग्य विभागाने जंतूनाशकांची फवारणी केली....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/swine-flu-Two-patients-in-Miraj/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/swine-flu-Two-patients-in-Miraj/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬