महापूर आणि दुष्काळाने श्रावण उत्सवावर सावट

  |   Sataranews

शिंगणापूर : वार्ताहर

कोल्हापूर, सांगली, कराड व पाटण तालुक्यात आलेल्या महापूराचा फटका तीर्थक्षेत्रांना बसला आहे. शिखर शिंगणापूर येथील श्रावण उत्सवावर महापूराचे सावट दिसून येत आहे. महापूर व दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा भाविकांची संख्या घटली असल्याने आर्थिक उलाढालही मंदावली आहे.

शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असते. मात्र यावर्षी श्रावण उत्सवावर दुष्काळी परिस्थिती व महापूराचे सावट दिसून येत आहे. शिखर शिंगणापूर, गोंदवले, म्हसवड, औंध या तीर्थक्षेत्रांसह पर्यटन स्थळांच्या ठिकाणीही परिणाम दिसून येत आहे. सर्वच ठिकाणी भाविक, पर्यटकांची संख्या घटली असल्याचे चित्र आहे. महापूरामुळे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे दळणवळण ठप्प झाले आहे. तर अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. पर्यटनासह तीर्थाटनावर याचा परिणाम झाला आहे. महापुरात हजारो लोक अडकून पडल्याने भाविकांची संख्याही घटू लागली आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Floods-and-droughts-swirl-over-the-Shravan-festival/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/Floods-and-droughts-swirl-over-the-Shravan-festival/

📲 Get Satara News on Whatsapp 💬