यंदाच्या गणेशोत्सवात शाडू मूर्तीची क्रेझ!

  |   Akolanews

अकोला: निसर्ग आणि गणेशोत्सव हे वेगळेच नाते आहे. ज्या निसर्गातून बाप्पांची मूर्ती घडविण्यासाठी आपण माती घेतो, ती माती निसर्गालाच समर्पित केली पाहिजे. यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. काळाची ही गरज ओळखून पर्यावरणप्रेमींनी मातीचा गणपतीची स्थापना करण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रात मोहीम हाती घेतली आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती दिसायला आकर्षक असल्या तरी शाडूच्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत असल्याने शाडूच्या मूर्तीकडे भाविक वळत आहे. तर काही घरीच मूर्ती बनविण्याच्या तयारीला लागले आहेत; पण शाडू म्हणजे नेमके काय, ती कुठे मिळते, कशी तयार होते, याबाबत अजूनही सामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो.

शाडूचा शब्दश: अर्थ म्हणजे पांढºया रंगाची चिकण माती. शाडू माती ही गुजरातच्या पोरबंदर येथून देशभरात विक्रीस जाते. या मातीची मागणी जास्त असून, पुरवठा कमी आहे. त्यामुळे मूर्तीचे उत्पादन कमी होत असल्याने त्याच्या किमती प्लास्टरच्या तुलनेत जास्त असतात. समुद्रातील खडकापासून शाडू माती तयार केली जाते. हा दगड गिरणीत दळला जातो. महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात शाडू मातीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात. येथील गणपतीच्या मूर्ती जगभरात जातात....

फोटो - http://v.duta.us/3OXj3gAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/QAp9XgAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬