शिराळा: पूरग्रस्त भागांची पाहणी सुरू

  |   Sanglinews

शिराळा: प्रतिनिधी

शिराळा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व वारणा, मोरणा नदीस महापूरामुळे १९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. नदी काठाच्या २४ गावांतील सुमारे ८ हजार ५०० हेक्टर तर ६७ गावातील पिकांचे ऊस व खरिप हंगामातील भात, सोयाबीन व ज्वारी, मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे.

तहसीलदार गणेश शिंदे गटविकास, अधिकारी डॉ.अनिल बागल यांनी पुरग्रस्त गावांची पहाणी करून पुरग्रस्तांना मदत देण्याचे काम सुरू केले आहे. पाच हजार रुपये रोख व ५ हजार रुपये खात्यावर जमा केले आहेत. तालुक्यातील वारणा व मोरणा नदीस आलेल्या पूरामध्ये २० जनावरे मरण पावली आहे.

लहान जनावरांना प्रत्येकी १६ हजार तर मोठ्या जनावरांना प्रत्येकी ३० हजार रुपये देण्यात आले आहे. कालावधीत बिळाशी येथील नामदेव महादेव शिंदे (वय ७०) या वृद्धाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात २१ गावांतील ५९० कुटुंबातील लोकांना आज ५ लिटर रॉकेल वाटप करण्यात आले आहे. त्यांना यापूर्वी २० किलो धान्य वाटप करण्यात आले आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Work-on-helping-the-afflicted-by-inspecting-the-affected-villages/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Work-on-helping-the-afflicted-by-inspecting-the-affected-villages/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬