शाहूनगरात विजेच्या खांबावरून पडून एकाचा मृत्यू

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

शाहूनगरमधील एका विजेच्या पोलवरून खाली पडल्याने रवींद्र महादेव रोकडे (वय 45) यांचा मृत्यू झाला. अनधिकृतपणे खांबावर चढून त्यांचा मृत्यू झाल्याने रवींद्र रोकडे यांच्या विरोधातच शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी शाहूनगर येथील अजिंक्य बाजार चौकामध्ये वीज मंडळातील कर्मचारी खांबावर काम करत असताना पडल्याची घटना वीज मंडळास कळवण्यात आली. त्यावेळी मंडळाचे अधिकारी तिथे पोहोचले असता एका जखमी इसमाला रिक्षात घालून नेण्यात येत होते. तो वीज मंडळाचा कर्मचारी नव्हता. मात्र, तो कशासाठी चढला होता याबाबत तिथे जमलेल्या कोणीही माहिती दिली नाही. त्यावर वीज मंडळाचे अधिकारी किशोर शामराव शिंदे यांनी घडलेल्या घटनेची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/One-dies-after-falling-from-a-electricity-pole/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/One-dies-after-falling-from-a-electricity-pole/

📲 Get Satara News on Whatsapp 💬