साखळीत बस उलटून १३ प्रवासी जखमी

  |   Goanews

डिचोली : प्रतिनिधी

फोंडा ते डिचोली मार्गावर वाहतूक करणारी लक्ष्मी नामक जीए 04-टी-0535 ही प्रवासी बस वसंतनगर हरवळे, साखळी येथे शनिवारी सकाळी 11.30 वाजता रस्त्यावर उलटल्याने 13 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी 4 जणांना अधिक उपचारासठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आले होते. बसचालक दिलीप पिळगावकर (वय 51, रा. वेळगे साखळी) याला डिचोली पोलिसांनी अटक केली. सदर अपघात प्रवाशांसाठी चाललेल्या स्पर्धेतून झाला असावा, असा संशय घटनास्थळी उपस्थित लोकांनी व्यक्त केला.

फोंडा येथून डिचोलीला जाणारी सदर बस भरधाव वेगाने जात असताना रस्त्याच्या बाजूला मातीत असलेल्या एका वीज खांबाला धडकून रस्त्यावर आडवी झाली. यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला बसने धडक दिल्याने कठड्याचीही मोडतोड झाली.

अपघात घडताच स्थानिक लोक तसेच रस्त्यावरून ये-जा करणार्‍या लोकांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. 108 रूग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना साखळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. एकूण 13 प्रवासी अपघातात जखमी झाले असून त्यापैकी 4 गंभीर जखमींना बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आले. संध्याकाळी त्यांची प्रकृती ठिक झाल्याने घरी पाठविण्यात आले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/13-passenger-injured-in-bus-accident-in-Sakhali-Ponda/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Goa/13-passenger-injured-in-bus-accident-in-Sakhali-Ponda/

📲 Get goanews on Whatsapp 💬