सांगलीतून काढला हजार टन कचरा

  |   Sanglinews

सांगली : प्रतिनिधी

महापुरानंतर शहरात कचर्‍याचे डोंगर उभारले होते. ते हटविण्यासाठी महापालिका तसेच राज्यभरातून आलेल्या मनपा, नगरपालिका, सामाजिक संस्थांच्या मदतीने युद्धपातळीवर सफाईमोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत शनिवारी दिवसभरात तब्बल हजार टन कचरा हटविण्यात आला. यातून कचर्‍याने तुंबलेला शास्त्री चौक-कोल्हापूर रस्ता, कर्नाळ रस्ता, गावभाग स्वच्छ झाला.

महापालिका आयुक्त नितीन कापडनीस यांच्या नेतृत्वाखाली शाखा अभियंता वैभव वाघमारे, सहाय्यक आयुक्त कवाडे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आर. के. यादव आदींनी ही मोहीम राबविली. यासाठी 20 डंपर ट्रक, 12 टँकर, 5 जेबीसी, 125 कर्मचारी यांच्या मदतीने 1000 टन कचरा बेडग व समडोळी रस्त्यावर डेपोवर हलविण्यात आला. यामुळे वाहतुकीची कोंडी फुटली. यासोबतच रात्री उशिरापर्यंत कचरा संकलन, औषध फवारणी, धूर फवारणी कण्यात आली. निर्धार फौंडेशनच्या 20 सदस्यांनी औषध फवारणीसाठी पुढाकार घेतला....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Thousands-of-tonnes-of-waste-was-removed-from-Sangli/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Thousands-of-tonnes-of-waste-was-removed-from-Sangli/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬