[ahmednagar] - नगर: सलग सुट्ट्यांचा फटका, पुणे-नाशिक महामार्गावर कोंडी

  |   Ahmednagarnews

नगर: सलग आलेल्या सुट्ट्या संपवून चाकरमानी घराकडे परतू लागल्याने आज दुपारनंतर पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव टोलनाक्‍यावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. टोलनाक्‍याबरोबरच महामार्गावर ठिकठिकाणी प्रवाशांची गर्दी दिसून आली. टोल वसुलीवर ताण पडला होता. पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तोबा गर्दी होती. त्यामुळे वाहनांमध्येच बराच वेळ बसून रहावे लागल्याने चाकरमान्यांचा संतापाचा पारा चढला होता.

सलग सुट्ट्या आल्याने रक्षाबंधनासाठी अनेक चाकरमानी कुटुंबीयांसह गावाकडे आले होते. सुट्ट्या संपल्याने उद्यापासून पुन्हा कामावर हजर होण्यासाठी चाकरमान्यांनी मुंबई-पुण्याचा रस्ता धरला. त्यामुळे दुपारपासूनच महामार्गावर वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे महामार्ग 'हाऊसफुल्ल' झाला होता. विशेषत: नाशिककडे जाणाऱ्या वाहनांची संख्या तुरळक होती. नाशिक, संगमनेरहून पुणे, मुंबईला जाणाऱ्या चारही मार्गावर वाहनांच्या रांगा दिसत होत्या. त्यामुळे महामार्ग वाहनांनी फुलून गेला होता. सुमारे दोन ते तीन किलोमीटर रांगा लागल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. कोंडीतून मार्ग काढण्यासाठी चालक मिळेल. त्या जागेतून वाहने पुढे नेत असल्याने ही कोंडी अधिकच गुंतागुंतीची होत होती. त्यामुळे टोलनाका पास करण्यासाठी किमान अर्ध्या तासाचा कालावधी लागत होता. दुचाकीस्वारांसाठी जागाच नसल्याने मिळेल, त्या जागेतून दुचाकीस्वार पुढे जात होते. त्यातूनही कोंडीत भर पडत होती....

फोटो - http://v.duta.us/72ocIAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/B_xHvQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬