[ahmednagar] - मंत्री शेलारांच्या शब्दावर रस्ता रोको मागे

  |   Ahmednagarnews

क्रीडाधिकाऱ्यांवर कारवाईची ग्वाही; खेळाडूंचे पुढील आंदोलनाचेही नियोजन सुरू

म. टा. प्रतिनिधी, नगर

शालेय शिक्षण व क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी नगरच्या क्रीडाधिकारी कविता नावंदे यांच्यावर कारवाई करण्याबाबत ग्वाही दिली आहे. यासंदर्भात मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर खेळाडू व क्रीडा शिक्षकांनी शनिवारी (१७ ऑगस्ट) सुरू केलेले रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. अर्ध्या तासाच्या या आंदोलनामुळे नगर-पुणे रस्त्यावरील सक्कर चौकात वाहतूक ठप्प झाली होती.

येत्या आठवडाभरात नावंदे यांची बदली झाली नाही, तर पुढच्या आठवड्यातील नगर दौऱ्यात २४ रोजी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार असून २९ ला राष्ट्रीय क्रीडादिनी उपोषण व छत्रपती पुरस्कार वापसी मोहीम राबविणार असल्याचे क्रीडा शिक्षकांचे नेते प्रा. सुनील जाधव यांनी सांगितले.

जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे मनमानी कारभार करीत असल्याने त्यांच्या बदलीच्या मागणीसाठी शनिवारी (१८ ऑगस्ट) सकाळी साडेअकराच्या सुमारास सक्कर चौकात खेळाडू व क्रीडा शिक्षकांनी रस्ता रोको आंदोलन केले. प्रा. जाधव यांच्यासह अप्पा शिंदे, राजेंद्र कोतकर, प्रा. सुनील पंडित, प्रा. संजय साठे, विजय म्हस्के, शैलेश गवळी, महेंद्र हिंगे, सोपान लांडे, नंदकुमार शितोळे, संजय भुसारी, शिवाजी वाबळे, पप्पू शिरसाठ, बाबासाहेब वाणी आदी क्रीडा शिक्षकांसह नगर शहर तसेच पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर येथील खेळाडूंसह २२ संघटनांचे पदाधिकारी व खेळाडू या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनाला सर्व राजकीय पक्षांनीही जाहीर पाठिंबा दिला होता. सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळी आंदोलनातही सहभागी झाली होती. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. अभय आगरकर तसेच शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, काँग्रेसचे बाळासाहेब हराळ आदी यात सहभागी झाले होते....

फोटो - http://v.duta.us/BdIPjwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/BUKQDQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬