[aurangabad-maharashtra] - ‘अतिक्रमण हटाव’चे आदेश अडगळीत

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचे इशारे दिले. त्यानंतर तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मात्र, कारवाईची कसलिही हालचाल नाही. त्यामुळे अतिक्रमण हटाव विभागातील अधिकारी, कर्मचारी हे प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे ऐकत नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिका प्रशासनाने सहा वर्षांपूर्वी रस्त्यांचे रुंदीकरण केले. परंतु रुंद केलेल्या रस्त्यांवर हातगाड्या, टपऱ्या आणि शेडचे अतिक्रमण झाले. त्यामुळे रुंद केलेले रस्ते पुन्हा अरुंद झाले. या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवा, अशी मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार केली, पण त्यांच्या मागणीकडे तेवढ्या गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर देखील महापौर नंदकुमार घोडेले यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेची घोषणा केली. प्रामुख्याने जुन्या शहरातील, शहागंज परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश त्यांनी अतिक्रमण हटाव विभागाला दिले. महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आमखास मैदानाच्या बाजूने दुकाने थाटण्यात आली आहेत. दुकानांचे हे अतिक्रमणच असून सर्व दुकाने पाडून टाका, असे आदेश देखील महापौरांनी दिले. त्यानुसार अतिक्रमण हटाव विभागाने दोन वेळा कारवाई देखील केली, परंतु पुन्हा या ठिकाणी दुकाने थाटण्यात आली आहेत. आता या ठिकाणी चार चाकी वाहनांच्या रि सेलचे दुकान थाटण्यात आले आहे....

फोटो - http://v.duta.us/qPrPKgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/yuqLcQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬