[aurangabad-maharashtra] - विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेची हमी काय ?

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनीच्या छेडछाड प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी तक्रार आणि अहवाल आल्यानंतर सोमवारी (१९ ऑगस्ट) कारवाई करण्यात येणार आहे. ही घटना विद्यापीठ कॅम्पसमध्ये घडली नसल्याचा दावा करीत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली.

नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थिनीच्या छेडछाड प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने माहिती मागवली आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते व प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे कारवाई करणार आहेत. नाट्यशास्त्र विभागाच्या परिसरात मध्यरात्री छेडछाडीचा गंभीर प्रकार घडल्यानंतरही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार डीकेएमएम कॉलेज परिसरात झाला असून विद्यापीठात झाला नसल्याचा दावा रेटला जात आहे. प्रत्यक्षदर्शी सुरक्षारक्षक, विद्यार्थी, प्राध्यापकांनी हा दावा फेटाळला आहे. अंगावरील जबाबदारी ढकलण्यासाठी बनाव उभा केला जात आहे. परराज्यातील विद्यार्थिनीच्या पालकांना पाठबळ देण्याऐवजी प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आणणे योग्य नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. छेडछाडीची घटना घडल्यानंतर विद्यार्थिनी तणावाखाली आहे. तिचे पालक शनिवारी सकाळी शहरात पोहचले. विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक आणि काही विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेऊन धीर दिला. या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून संबंधित विद्यार्थिनीकडून खुलासा लिहून घेण्यात आला आहे. ही घटना बाहेर घडल्याचे पत्रात नमूद केले आहे. मात्र, हा खुलासा दबावाखाली लिहून घेतल्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे विद्यार्थिनीकडून खुलासा लिहून घेण्यात आला. पण, विद्यार्थ्याला मोकळीक दिली असून हा विद्यार्थी अजूनही विभागात आला नाही. या विद्यार्थ्यावर कठोर कारवाईची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे....

फोटो - http://v.duta.us/v9xMxQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/fwpCbAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬