[aurangabad-maharashtra] - शिक्षणात उच्चवर्णीयांची मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'देशाच्या शासनकर्त्यांनी शिक्षण उच्चवर्णीयांसाठी उभे करण्याचा कट रचला आहे. त्यांचा उच्चवर्णीयांची मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,' असा आरोप प्रा. सुशिला मोराळे यांनी शनिवारी केला. त्या अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेतर्फे आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयावरील परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यापक सभेचे अध्यक्ष माजी आमदार जयवंतराव ठाकरे होते. कार्यक्रमाला शरद जावडेकर, अजमल खान, एस. पी. जवळकर आदींची विशेष उपस्थिती होती. यावेळी प्रा. मोराळे म्हणाल्या, 'आपल्या मुलांना शिक्षण मिळत आहे, पण त्यांना मिळणाऱ्या शिक्षणाची चिंता करण्याची वेळ राज्यकर्त्यांमुळे आपल्यावर आली आहे. त्यांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. त्यात आपण शिकार होत चाललो आहोत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकांना विक्रेते तर विद्यार्थ्यांना ग्राहक बनवले आहे. शैक्षणिक संस्थांना कंपनी संबोधले आहे. नवीन शैक्षणिक धोरण ठरवताना राज्यकर्त्यांनी अकलेचे तारे तोडले आहेत,' अशी टीका त्यांनी केली. शरद जावडेकर यांनी शिक्षणाचे अर्थकारण या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९मध्ये सरकारने शिक्षण क्षेत्रात भांडवलदारांनी लुटमार करावी म्हणून शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी सताड उघडी केली आहेत. त्यामुळे या धोरणाची चिकित्सा होणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात पाहिजे तेवढी जागृती दिसत नाही आणि राज्यकर्त्यांना तेच हवे आहे,' असा उल्लेख देखील त्यांनी केला.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/avaC7gAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬