[kolhapur] - कारखानदारांचे बोटींतून बचावकार्य

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वत:कडील तीन बोटी उपलब्ध केल्या. समवयस्क मित्रांना सोबत पाण्यात उतरले, तीन दिवसाच्या कालावधीत शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी पोहचविले. अन्नधान्य आणि जीवनाश्यक वस्तूंची मदत केली. रमणमळा, महावीर कॉलेज परिसर आणि इतर ठिकाणी मिळून या पाचजणांच्या पथकाने जवळपास एक हजार लोकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षितपणे हलवले. त्यांना अन्य प्रकारची मदत मिळवून देण्याचे काम केले. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचे व्हाइस चेअरमन गोरख माळी आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक बांधिलकी जपली.

महापुरामुळे सिद्धार्थनगर, रमणमळा, महावीर कॉलेज परिसर, न्यू पॅलेस परिसर, शाहूपुरी, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. काहींच्या घरात पाणी शिरले, कुणाची दुकाने पाण्यात बुडाली. रमण मळा, न्यू पॅलेस परिसर आणि महावीर कॉलेजजवळच्या परिसरातील अनेक लोकांनाही झळ बसली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pjmAhQAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬