[kolhapur] - ड्रेनेज लाइनची सफाई

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरावर ओढवलेल्या आपत्कालीन परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने मुंबई महापालिकेची मदत घेतली. त्यांच्याकडून प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांसह पाच जेट मशिन आणण्यात आल्या. त्याद्वारे गेल्या पाच दिवसांत शहरातील ड्रेनेज लाइनची स्वच्छता करून २५ टन गाळ काढण्यात आला. पथकाने गेल्या अनेक दिवसांपासून चोकअप झालेल्या लाइन सुरू करुन दिल्या. पाचपैकी दोन जेट मशिन शनिवारी रात्री मुंबईकडे रवाना झाल्या.

मुसळधार पावसाने शहराला महापुराचा विळखा पडला. पुराच्या पाण्याबरोबर आलेल्या गाळामुळे शहरातील अनेक ओढे, नाले, गटर्ससह ड्रेनेज लाइन चोकअप झाल्या. महापालिकेने रस्त्यावरील स्वच्छतेला सुरुवात करतानाच मुंबई महापालिकेकडे ड्रेनेज लाइनची स्वच्छता करण्यासाठी जेट मशिनची मागणी केली होती. महापालिकेच्या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद देत पाच जेट मशिनसोबत प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांचे पथक पाठविण्यात आले. मंगळवारी (ता. १३) सकाळी या मशिन दाखल झाल्या. याद्वारे शहरातील ड्रेनेज लाइन साफ करण्याची मोहीम हाती घेतली....

फोटो - http://v.duta.us/fS_xugAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/fI3yvgAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬