[kolhapur] - मूग, मसूर, साबुदाणा महागले

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापूर ओसरल्यानंतर किराणा खरेदीकडे ग्राहकांची पावले वळली असून बाजारात मूग, मसूर, साबुदाणा, वेलदोड्याच्या दरात वाढ झाली आहे. वेलदोड्याच्या दरात प्रतिकिलो एक हजार रुपयांनी वाढ झाली असून ६० रुपये तोळा (दहा ग्रॅम) अशी विक्री सुरू आहे.

गेल्या दहा ते बारा दिवसात पावसाने झोडपून काढल्याने शहराला महापुराने वेढले होते. शहरात येणारे सर्व रस्ते बंद झाल्याने भाजीपाल्याची आवक थंडावली होती. त्यामुळे ग्राहकांकडून कडधान्यावर भर होता. पण, महापूर ओसरताच मूग, मसूर या कडधान्यांत वाढ झाली. मूगाच्या दरात प्रतिकिलो ४० रुपयांनी तर बेळगाव मसूरीच्या दरात वीस रुपयांनी वाढ झाली. मूगाचा दर प्रतिकिलो ८८ तर मसूरीचा दर १४० रुपयांवर पोचला आहे.

उपवासाच्या पदार्थांत साबुदाण्याला मोठी मागणी आहे. साबुदाण्याच्या दरात प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ झाली. रवा आणि आट्याचे दर प्रतिकिलो दोन वाढले आहेत. वेलदोड्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली. प्रतिकिलो सहा हजार रुपये असा...

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/tQUAZAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬