[kolhapur] - स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरुप

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापूर ओसरल्यानंतर महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेला शनिवारी व्यापक रुप मिळाले. महापालिका कर्मचाऱ्यांसह हजारो स्वयंसेवी सहभागी झाल्याने दिवसाभरात तब्बल १३० टन कचरा, गाळाची उचल करण्यात आली. जेसीबी, ट्रॅक्टर ट्रॉली, डंपर, टिपर यासह अन्य वाहनांतून उचल केलेला कचरा, गाळ कसबा बावड्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर टाकण्यात आला.

महापुरामुळे शहराच्या अनेक भागात पाण्याबरोबर गाळ व कचरा आला. पूरबाधित क्षेत्राबरोबर अन्य रस्तेही चिखलाने माखले होते. गेल्या आठ दिवसांपासून सफाई मोहीम सुरू आहे. शनिवारी शुक्रवार पेठ येथील पंचगंगा तालीम रोड, दुधाळी, उत्तरेश्वर पेठ, जुना बुध‌वार पेठ, सिद्धार्थनगर, व्हीनस कॉर्नर, शाहूपुरी कुंभार गल्ली, लक्ष्मीपुरी, खानविलकर पेट्रोल पंप यांसह शहराच्या अनेक रस्त्यांवर कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते स्वच्छता करताना दिसत होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pvqnoAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬