[mumbai] - एकात्मिक तिकीट प्रणालीला खीळ

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच कार्ड असावे यासाठी एमएमआरडीतर्फे राबवण्यात येणाऱ्या एकात्मिक तिकीट प्रणालीला खीळ बसली आहे. या प्रणालीएवजी 'वन नेशन, वन कार्ड' या धोरणाचा केंद्र सरकारने आग्रह धरल्याने आता पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

बस व उपनगरीय रेल्वे या मुंबईच्या दोन प्रमुख सार्वजनिक सेवा आहेत. त्यात आता मोनो व मेट्रोची भर पडली आहे. मेट्रोचे जाळे मुंबईसह ठाणे कल्याण, भिवंडीपर्यंत विस्तारत आहे. मोनोचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. या प्रकल्पांसह सार्वजनिक वाहतुकीचे आणखी काही प्रकल्प प्रस्तावित आहेत. भाऊचा धक्का ते रेवस मांडवा व नेरूळ या मार्गावर जलवाहतूक सुरू केली जाणार आहे. ठाणे आणि नवी मुंबईतही जलवाहतुकीची चाचपणी केली जात आहे. त्याशिवाय शिवडी ते एलिफंटा तसेच मालाड ते मार्वे, गोराई व बोरिवली येथे रोपवे प्रस्तावित आहे. एका अर्थाने सार्वजनिक वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत....

फोटो - http://v.duta.us/LC-WNgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pqG74gAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬