[mumbai] - कावळ्यांची नव्हे तर मावळ्यांची चिंता करा: पवार

  |   Mumbainews

मुंबई: आज अनेक लोक पक्ष सोडत आहेत. ज्यांच्यावर केसेस आहेत, त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत असल्याने हे पक्षांतर सुरू आहे. त्यामुळे पक्षगळती होत आहे. मात्र तुम्ही स्वच्छ असल्याने तुम्हाला चिंता करायची गरज नाही, असं सांगतानाच आता कावळ्याची चिंता करायची नाही, तर मावळ्यांची चिंता करायची, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आज पक्ष कार्यकर्त्यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाची बैठक पार पडली. या बैठकीला संबोधताना शरद पवार यांनी हा सल्ला दिला. देश चहूबाजूंनी संकटात आहे. आपला पक्ष हा विकासासोबत अन्यायावर मात करणारा पक्ष आहे. यासाठी संघटन मजबूत करणं गरजेचे आहे. यातून पक्षाला आणि राज्यालाही मोठा फायदा होणार आहे, असं पवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत तरुणांना आणि महिलांना पुढाकार देण्याच्या सूचना केल्या. विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्ष विचार करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं....

फोटो - http://v.duta.us/o_P4pQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/zjknAAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬