[mumbai] - मुंबईः राष्ट्रपतींनी घेतली लता मंगेशकरांची भेट

  |   Mumbainews

मुंबई ः देशाचे यांनी आज मुंबईत भारताची गानकोकीळा लता मंगेशकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. राष्ट्रपतींनी यावेळी लतादीदींच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुंबईतील राजभवन येथील भूमिगत बंकर म्युझियचे उद्धाटन करण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आले असता त्यांनी वेळात वेळ काढून लतादीदींची भेट घेतली.

राष्ट्रपतींनी या भेटीची माहिती ट्विटरवरून शेअर केली आहे. ट्विटरवर शेअर करताना त्यांनी म्हटलेय, लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतल्याने आनंद वाटला. यावेळी मी लतादीदींना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या मधूर आवाजाने लता दीदींनी भारताचा गौरव वाढवला तसेच आपल्या सर्वांच्या आयुष्यात गोडवा निर्माण केला आहे. त्यांच्याकडून आम्हाला सतत प्रेरणा मिळतेय, असे राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. राष्ट्रपतींच्या ट्विटनंतर लता दीदींनी आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत....

फोटो - http://v.duta.us/lZCa2wEA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/8xA-VgEA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬