[mumbai] - स्वातंत्र्यदिनी युरोपातील सर्वोच्च शिखरावर फडकला तिरंगा

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः युरोप खंडातील सर्वोच्च शिखरावर गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटनिअरिंगच्या गिर्यारोहकांनी तिरंगा फडकवून अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला. माऊंट एल्ब्रूस हे ५ हजार ६४२ मीटर उंचीचे शिखर असून एकूण १४ जणांच्या चमूने १५ ऑगस्टला सकाळी ही चढाई पूर्ण केली. एव्हरेस्ट व कांचनजुंगा शिखरवीर आनंद माळी व अंकित सोहनी यांच्या नेतृत्वाखाली ही चढाई करण्यात आली.

माऊंट एल्ब्रूसवर चढाई करणाऱ्या या संघामध्ये शरयू मिरजकर, साहिल जोशी, रोमीर मुखर्जी या पुण्यातील विद्या व्हॅली शाळेच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या संघामध्ये विविध वयोगटातील गिर्यारोहकांचा समावेश होता. डॉ. हेमंत शिराळी, वर्षा विनयदत्त, ज्योती खडसे, असीम जोशी, श्रीकांत धुमाळे, अमित बेंद्रे, निवेथा आर, मनीष पारीख यांनीदेखील ही शिखर चढाई यशस्वी केली. स्वातंत्र्यदिनी युरोपीताल सर्वोच्च शिखरावर तिरंग्याला मानवंदना देण्याचा आनंद काही वेगळाच होता, अशी भावना या गिर्यारोहकांनी व्यक्त केली....

फोटो - http://v.duta.us/YkvslwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/eH2YzgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬