[nagpur] - देशभरातील न्यायाधीशांची ड्रॅगन पॅलेसला भेट

  |   Nagpurnews

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

नागपुरात आयोजित १७व्या अखिल भारतीय विधी सेवा प्राधिकरणाच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या देशातील काही उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी शुक्रवारी कामठीतील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट दिली.या संमेलनाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील देशभरातील शंभरावर न्यायाधीश नागपुरातील आले आहेत.

शुक्रवारी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे न्या. राजेश बिंडाल, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे न्या. लोकपाल सिंग, राजस्थान उच्च न्यायालयातील न्या. शबाना, जयपूर उच्च न्यायालयातील न्या. मोहम्मद रफिक यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट दिली. याप्रसंगी टेम्पलच्या प्रमुख व राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या अॅड. सुलेखा कुंभारे न्यायाधीशांचे स्वागत केले. न्यायाधीशांनी येथील गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर वंदन केले. या वेळी सामूहिक बुद्धवंदना, जपानी चँटिंग व पाच मिनिटांचे मेडिटेशन घेण्यात आले. अॅड. कुंभारे यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पलबाबत न्यायाधीशांना माहिती दिली. ड्रॅगन पॅलेस टेम्पल जागतिक वारसा झाले पाहिजे, अशी इच्छा जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे न्या. बिंडाल यांनी व्यक्त केली.

फोटो - http://v.duta.us/LfV-MAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/j5HZNwAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬