[nagpur] - नॅशनल लॉ स्कूलचे आज भूमिपूजन

  |   Nagpurnews

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

नॅशनल लॉ स्कूल नागपूरच्या वारंगा येथील ६० एकरमधील प्रस्तावित कॅम्पसचे भूमिपूजन देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या हस्ते आज, रविवारी होत आहे. आगामी तीन ते चार वर्षांत लॉ स्कूलचे स्टेट ऑफ आर्ट ग्रीन कॅम्पस उभारण्यात येत आहे.

वारंगा येथे दुपारी २.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती व नॅशनल लॉ स्कूलचे कुलपती शरद बोबडे राहतील. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एन. व्ही. रामणा, न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई हायकोर्टातील मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे, नागपूर खंडपीठातील प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंद्र कुमार उपस्थित राहतील.

नागपुरात नॅशनल लॉ स्कूल स्थापन व्हावे, अशी मागणी हायकोर्ट बार असोसिएशनच्या ७५व्या वर्धापनदिनी तत्कालीन अध्यक्ष अॅड. अनिल मार्डीकर यांनी सर्वप्रथम केली होती. तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. तेव्हापासून नॅशनल लॉ स्कूलची मागणी करण्यात येत होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी पूर्ण करीत नागपुरात नॅशनल लॉ स्कूल स्थापन केले. त्यासाठी मिहानमधील वारंगा येथे ६० एकर जमीनदेखील देण्यात आली. दरम्यान, नॅशनल लॉ स्कूलचा विकास करण्यासाठी कुलपती न्यायमूर्ती शरद बोबडे आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांनी विशेष प्रयत्न केले. वारंगा येथील कॅम्पसचा आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातून सर्वोत्तम असे मॉडेल तयार करण्यात आले. नागपूरपासून २३ कि.मी. अंतरावर असलेल्या वारंगा येथे सुमारे ३५०० विद्यार्थ्यांची क्षमता असणारे कॅम्पस विकसित होईल. तीन टप्प्यांमध्ये कॅम्पस तयार होणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात संरक्षण भिंत, रस्ते, एसटीपी युनिट, तेथील तलाव, शैक्षणिक वास्तू, प्रशासकीय इमारत, प्राध्यापकांसाठी निवासस्थाने यांसारख्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/3J1AdAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬