[nagpur] - पाकने आगळीक केल्यास सडेतोड उत्तर देऊ

  |   Nagpurnews

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर

पाकिस्तानने अथवा दहशतवाद्यांनी भारताविरूद्ध कोणतीही कारवाई केल्यास त्याचे सडेतोड उत्तर देण्यात येईल. केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी समर्पित आहे असे खडे बोल विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सुनावले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मिरातून कलम ३७० रद्द केल्यानंतर केलेल्या विधानांचा खरपूस समाचारही त्यांनी घेतला.

राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या अखिल भारतीय संमेलनाच्या उद्घाटनासाठी विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद शनिवारी नागपुरात आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जम्मू काश्मीरमधील कलम ३७० ही तात्पुरती सोय होती. परंतु, त्या कलम ३७० मुळेच दहशतवादी आणि फुटीरवाद्यांना देशविघातक कारवाया करण्याचे व्यासपीठ मिळाले होते. ते कलम आता रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे काश्मिरातील जनता आता देशाच्या मुख्य प्रवाहात आली आहे. कलम ३७० मुळे अनुसूचित जाती जमातींच्या विशेष सवलती काश्मिरात लागू नव्हत्या. भ्रष्टाचार विरोधी कायदा, बाल विवाह प्रतिबंधक कायदा आणि मानवी विष्ठा वाहून नेणास प्रतिबंध घालणारा कायदाही तिथे लागू नव्हता. कलम ३७० मुळे निर्माण झालेले काश्मीर हे नंदनवन नव्हते. परंतु, आता काश्मीरच्या विकासाला चालना मिळणार आहे. काश्मिरातील प्रशासन विकास कामांना गती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/mdD9xwAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬