[nashik] - अनुराधा टॉकीजला आग

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड एकेकाळी उत्तर महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या नाशिकरोड येथील प्रसिद्ध अनुराधा चित्रपटगृहाला शनिवारी सकाळी आग लागली. नाशिकरोड आणि नाशिकच्या मिळून चार अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणली. बहुपडदा सिनेमागृहाच्या लाटेमुळे अनुराधा चित्रपटगृह बंद आहे. त्याचे सीलिंग, पीओपी व अन्य साहित्य काढण्याचे काम सुरू होते. शनिवारी सकाळी नागरिकांनी धूर पाहिल्यानंतर अग्निशमन दलाला कळवले. नाशिकरोड आणि नाशिक येथील चार बंब दाखल झाले. त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर एका तासाने आग आटोक्यात आली. हे सिनेमागृह १९७५ ला गुढीपाढव्याच्या मूहूर्तावर सुरू झाले होते. उद्योजक बाबूशेठ कलंत्री यांनी हे चित्रपटगृह सुरू केले. सुनील दत्त, रिना राय आदींची प्रमुख भूमिका असलेचा नागीन चित्रपट प्रथम या चित्रपटगृहात झळकला होता. उत्तर महाराष्ट्रातील हे त्यावेळचे मानाचे सिनेमागृह होते. एकमेव वातानुकूलित सिनेमागृह अशी त्याची ओळख होती. पडदाही भव्य होता. सिनेमागृह पाहण्यासाठी अन्य जिल्ह्यांतून रसिक येत असतं. सुरुवातीला सकाळी दहाला इंग्रजी, बाराला मॅटिनी आणि नंतर तीन हिंदी असे पाच खेळ होत असत. दादा कोंडकेंचे चित्रपट येथे प्रथम झळकायचे. दादांचे बहुतेक चित्रपट किमान शंभर दिवस चालत असत. जितेंद्र, हेमामालिनी यांच्या मेरी आवाज सुनो चित्रपटाचे सहा खेळ झाले होते.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/vkanRQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬