[nashik] - नाशिक - विमा दावा नाकारणाऱ्या ‘ओरिएटंला’ दणका

  |   Nashiknews

विमा दावा नाकारणाऱ्या 'ओरिएटंला' दणका

न्यायमंचाचे दाव्याची रक्कम व्याजसह देण्याचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले नाही याचा आधार घेत विमा दावा नाकारणाऱ्या ओरिएटंल इन्शुरन्स कंपनीला जिल्हा ग्राहक न्यायालयाने दणका देत दाव्याची रक्कम ४३ हजार २१४ रुपये व्याजासह देण्याचे आदेश दिले आहे. याबरोबरच कंपनीला शारिरीक व मानसिक त्रासापोटी सात हजार व अर्जाचा खर्च पाच हजार असे बारा हजार रुपये तक्रारदाराला देण्याचे आदेश दिले आहे.

कॅनडा कॉर्नरवरील विसे मळ्याजवळ राहणाऱ्या यतिन बाळकृष्ण कुलकर्णी यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा निकाल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दिला आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, १९९९ मध्ये स्वत.साठी व आईवडिलांसाठी आरोग्य विमा पॉलिसी घेतली होती. त्या पॉलिसीचे वेळोवेळी नुतणीकरणही केले आहेत. ही पॉलिसी असतांना वडील बाळकृष्ण कुलकर्णी यांचे हर्नियाचे ऑपरेशन निरामय नर्सिंग होम येथे केले. पण, विमा कंपनीने हे रुग्णालय 'क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट (रजिस्ट्रेशन अॅण्ड रेग्युलेशन) अॅक्ट २०१०' नुसार लोकल अॅथॉरिटीकडे नोंदवले गेले नसल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे पॉलिसीच्या अटीचा भंग झाल्याचे सांगितले व दावा नाकारला. पण, याच रुग्णालयात २०११ मध्ये करण्यात आलेल्या हार्नियाच्या उपचाराचा खर्च विमा कंपनीने दिला होता असेही त्यांनी न्यायमंचाला सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/l9izyAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬