[nashik] - हेल्मेट वापरामुळे टळतोय मृत्यू

  |   Nashiknews

गतवर्षीच्या तुलनेत अपघात अन मृत्यूही कमी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हेल्मेट न वापरणाऱ्यांवर पोलिसांनी सुरू केलेली कारवाई, हेल्मेट वापराबाबत सुरू असलेली जनजागृती यामुळे नागरिक हेल्मेट वापराला प्राधान्य देऊ लागले आहेत. याचे चांगले परिणाम दिसण्यास सुरुवात झाली असून जुलै अखेरपर्यंत शहरात अपघात आणि अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

गतवर्षी १ जानेवारी ते २० जुलै या काळात ३४७ अपघातांत १२३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. यंदा याच कालावधीत ३१६ अपघात झाले असून त्यामध्ये ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच अपघात आणि मृत्यू होण्याच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. शहरात ठिकठिकाणी वाहतूक पोलिस हेल्मेट आणि सीट बेल्ट न वापरणाऱ्यांवर कारवाई करताना दिसतात. हेल्मेट न वापरणाऱ्यांचे प्रबोधनही करीत असतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. या सर्व कारवायांमुळे नागरिकांमध्ये जनजागृती होत असून अपघातांची तसेच अपघाती मृत्यूंची संख्या कमी झाली आहे. भविष्यात हे प्रमाण आणखी कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती नांगरे पाटील यांनी दिली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/J0h7aAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬