[navi-mumbai] - अवजड वाहनांचे महामार्गावर अतिक्रमण

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, पनवेल

नव्याने रुंदीकरण केलेल्या कळंबोली येथील पनवेल-मुंब्रा मार्गावर उड्डाणपुलाखाली आणि महामार्गाच्या कडेला अवजड वाहने उभी राहत आहेत. हाकेच्या अंतरावर असलेल्या कळंबोली वाहतूक पोलिसांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असून, ते जाणीवपूर्वक याकडे काणाडोळा करत असल्याचे बोलले जात आहे.

कळंबोली शहराला लागून असलेल्या पनवेल-मुंब्रा महामार्गावर उड्डाणपूल झाल्यामुळे बिमा कॉम्प्लेक्स, कळंबोली अग्निशमन केंद्र येथे होणारी वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली व कळंबोलीतून स्टील मार्केटकडे जाणाऱ्या मार्गाची कोंडीही संपुष्टात आली. तळोजा एमआयडीसी आणि जेएनपीटीच्या दिशेने जाणारी वाहने उड्डाणपुलावर पुढे निघून जातात. मात्र सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडच्या कडेला अवजड वाहने उभी केली जात आहेत. रस्त्यावर कमी रहदारीचा फायदा घेऊन ही अवजड वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. वाहतूक पोलिसांनी वेळीच याला आवर घातला नाही तर भविष्यात ही वाहने याठिकाणी बस्तान बांधतील, अशी भीती व्यक्त होत आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/--Y_FQAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬