[navi-mumbai] - विकासकामांना प्रतीक्षा

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

आगामी विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर सहा महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीमुळे नवी मुंबईत निर्माण होणाऱ्या संभाव्य राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सुमारे १०० कोटींहून अधिक खर्चाचे ६८ प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रशासकीय मंजुरीसाठी ठेवले आहेत. या विकासकामांना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंजुरी मिळाली तरी प्रत्यक्ष ही सर्व कामे निविदाप्रक्रिया राबवून सुरू होण्यास तब्बल सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याचे महापालिकेत काम करणाऱ्या ठेकेदारांचे म्हणणे आहे.

महिन्याभरापूर्वी महापालिकेतून बदली झालेले तत्कालीन आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे आगामी विधानसभा आणि त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत संपन्न होणाऱ्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आपापल्या प्रभागातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी व नगरसेवक यांनी सतत पाठपुरावा सुरू केला होता. त्यादृष्टीने डॉ. रामास्वामी एन. यांनीदेखील आवश्यक असलेली विकासकामे करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र त्याचदरम्यान त्यांची बदली झाल्यानंतर नव्याने महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतलेल्या अण्णासाहेब मिसाळ यांनी आरोग्य, शिक्षण व परिवहन सेवेसह शहरातील विकासकामांकडे लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवलेल्या प्रस्तावावरून दिसून येते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/WuOwpAAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬