[pune] - अपूर्ण प्रकल्पांना बापटच जबाबदार

  |   Punenews

खासदार वंदना चव्हाण यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने घोषणा केलेल्या अनेक प्रकल्पांना अद्याप गती मिळाली नाही. या स्थितीला माजी पालकमंत्री आणि शहराचे विद्यमान खासदार गिरीश बापटच जबाबदार आहेत. पालकमंत्रिपदाच्या काळात त्यांना शहराचे पालकत्त्व सांभाळता आले नाही', अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी बुधवारी केली. गेल्या अडीच वर्षांच्या भाजपच्या कार्यकाळात महापालिका भ्रष्टाचाराने बरबटल्याचे चित्रच पुणेकरांना पाहायला मिळते, ही शोकांतिका आहे असा टोमणाही त्यांनी लगावला.

'पालिकेतील सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे असताना शहरातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले; परंतु गेल्या अडीच वर्षांमध्ये एकहाती सत्ता मिळूनही भाजप आणि माजी पालकमंत्र्यांना एकही प्रलंबित प्रकल्प सुरू करता आला नाही,' असे टीकास्त्र चव्हाण यांनी सोडले. पालकमंत्री असताना बापट यांच्याकडे सर्व जबाबदारी होती; पण त्यांनी त्यावेळी या कोणत्याच प्रकल्पाकडे लक्ष दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला. समान पाणीपुरवठा (२४ बाय ७), मुळा-मुठा शुद्धीकरण प्रकल्प यासारख्या मोठ्या प्रकल्पांच्या कामातही भ्रष्टाचार होत असून, पुणेकरांच्या कररूपातून गोळा होणारे पैसे वाया घालविण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, असा दावा चव्हाण यांनी केला....

फोटो - http://v.duta.us/72BS-QAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/M_gjiQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬