[pune] - ऑर्डनन्स कामगार२०पासून संपावर

  |   Punenews

राज ठाकरेंना पाठिंब्याची विनंती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ऑर्डनन्स फॅक्टरींच्या खासगीकरणाला कामगारांचा विरोध तीव्र होणार असून, कामगारांच्या २० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या देशव्यापी संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा द्यावा, अशी विनंती देण्याची मागणी कामगारांनी शनिवारी केली. याबाबत अॅम्युनेशन फॅक्टरी वर्कर्स युनियनच्या शिष्टमंडळाने ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली.

'देशात एकूण ४१ ऑर्डनन्स फॅक्टरी असून, त्यातील दहा राज्यात आणि तीन पुण्यात आहेत. केंद्र सरकारने या फॅक्टरींचे महामंडळ स्थापन करण्याचा घाट घालून खासगीकरणाचा मार्ग मोकळा करण्याचे धोरण स्वीकारले आहे. हे धोरण प्रत्यक्षात आल्यास नोकऱ्या कमी होणार आहेत. सरकारने संरक्षण क्षेत्रात विदेशी कंपन्यांना गुंतवणूक करण्य़ाला मान्यता दिली आहे. या प्रकारांमुळे कामगारांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. बीएसएनएलला संपवल्याप्रमाणेच ऑर्डनन्स फॅक्टरींना संपविण्याचे मोठे कट कारस्थान रचण्यात येत आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीतून होणारे वित्तीय नुकसान कमी करण्यासाठी खासगीकरण हा उपाय नसून, रचनात्मक बदल होणे गरजेच आहे,' असे युनियनचे सचिन शसींद्रन नायर यांनी सांगितले....

फोटो - http://v.duta.us/M8fRugAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/iSpplQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬