[pune] - ‘डीबीटी’साठी सोळा हजार अर्ज

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडून देण्यात येणाऱ्या व्यवसायाभिमुख साहित्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील १६ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. यंदा 'डीबीटी' योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, अर्जांची पंचायत समिती पातळीवर छानणी सुरू आहे.

पुणे जिल्ह्यातील अत्यल्प उत्पन्न गटातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाकडून अनेक योजना राबविण्यात येतात. त्या अंतर्गत विविध साहित्य पुरविण्यात येते. त्यासाठी विभागाकडून अनुदान दिले जाते. यंदा मात्र अनुदान वस्तू खरेदी केल्याची खात्री होताच थेट पात्र व्यक्तीच्या बँक खात्यावर जमा कऱण्यात येणार आहे. 'डीबीटी'द्वारे ही रक्कम जमा केली जाते. यंदा महिलांना पीठ गिरणी, शिलाई मशिन देण्यात येणार आहे. पीठ गिरणीसाठी सर्वाधिक ११ हजार ५३८ महिलांनी अर्ज केले आहेत. शिलाई मशीनसाठी ५ हजार २५१ महिलांनी अर्ज केले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनेक मुलींना पायी शाळेत जावे लागते. त्यामुळे मुली अर्ध्यावरच शिक्षण सोडून देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मुलींना दर वर्षी सायकल वाटप करण्यात येते. यंदाही पाचवीतील मुलींना सायकल वाटप करण्यात येणार आहे. सायकलींसाठी ५ हजार ४८६ मुलींनी अर्ज केले आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/0TSGqwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬