[pune] - देश इतका कसा बदलला?

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'लोक सामूहिक हिंसाचाराचे बळी ठरत असल्याने सतत भीतीची गडद छाया घेऊन जगणे भयानक होत चालले आहे. अतिउजव्यांशी बोलून उपयोग नाही. खरे तर आता डावे-उजवे असे काही राहिलेले नाही. लोकांना मारण्याला कोणी विरोध करत नाही; पण प्रेम करायला मात्र विरोध होतो. हा देश इतका कसा बदलला...?' संवेदनशील लेखिका, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका अशी बहुआयामी ओळख घेऊन जगणारी नंदिता दास शनिवारी शब्दाशब्दांतून अंतर्मुख करत गेली. नंदिताचे व्यक्त होणे, प्रत्येकाला आपलीच अभिव्यक्ती वाटली. 'जग बदलणे हा वेडेपणा वाटला तरी वास्तववादाची किनार घेऊन तो करत राहायचा आहे,' अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.

'मिळून साऱ्याजणी' या मासिकाच्या ३० व्या वर्धापन दिन कार्यक्रमात संवेदनशील दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी नंदिताला बोलते करून सर्वांना तिच्या गप्पांमध्ये सहभागी करून घेतले. त्याआधी 'मिळून साऱ्याजणी' अंकाचे व ई-बुकचे तसेच सरिता आवाड लिखित 'हमरस्ता नाकारताना' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सोनाली दळवी, मासिकाच्या संपादिका गीताली वि. म. आणि संस्थापिका विद्या बाळ, 'बुकगंगा'चे मंदार जोगळेकर उपस्थित होते....

फोटो - http://v.duta.us/uNJcrwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1W3LtgAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬